06 October 2012

Hi,

This the video of my felicitation by our former President and Bharatratna Dr. A. P. J. Abdul Kalam for the contribution in the field of science communication through various media. 

15 August 2012

Have a Fun....


Watch these hungry little fish as they follow your mouse hoping 

you will feed them. Click the mouse on the surface of water and 

just watch.



09 April 2012

Bird Watching


वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा पक्षी निरीक्षणासाठी अनुकूल काळ असतो. साधारणपणे पहाटे, लवकर सकाळी किंवा संध्याकाळी पक्षी निरीक्षण करावे, कारण यावेळी बहुतेक पक्षी क्रियाशील असतात.पक्षी निरीक्षण करणं हे कौशल्याचं काम आहे. पक्षी निरीक्षणाला जाताना काळ्या-पांढऱ्या किंवा गडद रंगाचे कपडे टाळा. त्याऐवजी फिकट हिरव्या किंवा तपकिरी रंगाचे कपडे वापरा म्हणजे तुम्ही पक्ष्यांच्या चटकन नजरेत येणार नाही........

06 April 2012

मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार



आपल्या सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान प्रसारकास देण्यात येणा-या श्रीम. मनोरमाबाई आपटे पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली आहे. 
रुपये २५,००० आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
माझ्या या वाटचालीमध्ये आपण दिलेली साथसुद्धा मोलाची आहे. त्यामुळे याप्रसंगी मी आपले आभार मानतो.
धन्यवाद!

Click Here for More Information

http://www.mavipamumbai.org/awards-mar.htm

05 April 2012

Project on Water Audit

भारतात दरवर्षी सुमारे १०० तास पाऊस पडतो. हे पाणी साठवलं आणि जास्तीतजास्त पाणी जमिनीमध्ये मुरवलं तर देशातला पाणीप्रश्न निश्चितपणे सुटू शकतो. त्यासाठी आपण प्रत्येकाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व ओळखून पाणी वाया जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय जीवनापासूनच पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारे प्रयोग, उपक्रम, प्रकल्प करण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त करणं गरजेचं आहे. याची सुरुवात आपल्या घरापासूनच करता येईल......


27 February 2012

Project Funda : Newspapers



वर्तमानपत्रे : वाचनसंस्कृती रुजविणारे प्रभावी साधन

प्रत्येक वर्तमानपत्राचं शीर्षक वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जातं. या शीर्षकामध्ये अक्षरं लिहिण्याची शैली, अक्षरांचा आकार, रंगसंगती वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे वर्तमानपत्राच्या शीर्षकाखाली दिनांक, वार, आवृत्ती प्रकाशित झाल्याचे ठिकाण, किंमत, पृष्ठसंख्या इत्यादी माहिती दिलेली असते. प्राथमिक स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात उपलब्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांच्या शीर्षकांची कात्रणे चिकटवहीत चिकटवून शीर्षकाखाली छापलेल्या माहितीचे निरीक्षण व नोंद करण्यास सांगता येईल.
वर्तमानपत्रासाठी बातमी कशी मिळवली जाते, त्या बातमीचं प्रभावी सादरीकरण करण्यासाठी छायाचित्रे कशी घेतली जातात, या बातमीवर वार्ताहरापासून ते संपादकांपर्यंत कोण-कोण आणि कसे लेखन संस्कार करतात, बातमी छापण्यामध्ये पेज डिझायनरची भूमिका काय असते, वर्तमानपत्राची छपाई कशी केली जाते, गावोगावी ही सगळी वर्तमानपत्रं योग्य वेळेत कशी वितरित केली जातात, अशा संदर्भातला सर्वेक्षणात्मक प्रकल्प महाविद्यालयीन विद्यार्थी करू शकतात. या प्रकल्पातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष वापर हे विद्यार्थी महाविद्यालयातून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या भित्तीपत्रकांसाठी किंवा वार्षिक मासिकासाठी करू शकतात.......



CLICK HERE to Read More


20 January 2012

Steve Jobs



Its my great pleasure to inform that my 25th Book, titled "Tantradnyanacha Kimayagar Steve Jobs" published recently in Karad.
The publication ceremony was organized by Mr. Sanjay Pujari on behalf of Dr. Kalpana Chawla Science Centre.
I delivered a lecture with a slide show on Steve Jobs at this occasion.

Recently review of this book written by Jayant Erande as published in "Patrika" - A magazine by Marathi Vidnayn Parishad.

Please Read the Review of this book published in Loksatta.



















Web site launched

Please visit my website which is launched recently by veteran scientist and educationist, Padmabhushan awardee Prof. J. B. Joshi. This i...