संशोधन हे केवळ
अत्याधुनिक प्रयोगशाळेमध्येच केलं जातं असं नाही. तुमच्या-आमच्यातसुद्धा एक संशोधक
दडलेला असतो. अशाच काही संशोधकांचा आणि त्यांनी लावलेल्या शोधांचा परिचय करून
देणारं मासिक सदर..
'लोकसत्ता'मध्ये
तरंगणारा
साबण
आंघोळ करताना
बुळबुळीत झालेली साबणाची वडी हातातून सटकून बादलीतल्या पाण्यात पडल्याचं तुम्ही
कधी अनुभवलं आहे का? जर अनुभवलं असेल तर हातातून सटकलेली साबणाची वडी
बादलीतल्या पाण्यात पडल्यावर तरंगते का बुडते? आणि जर तुम्ही हे
अनुभवलं नसेल तर मग एक प्रयोग करून बघा. आंघोळीसाठी वापरात असलेली साबणाची वडी
बादलीभर पाण्यात टाका. तुम्हाला असं आढळेल की, साबणाची वडी थेट
बादलीच्या तळाशी जाते.
नेमकी हीच गोष्ट केरळमधल्या थ्रिसुर
जिल्ह्यातल्या कत्तुर या लहानशा गावात राहाणाऱ्या सी. ए. व्हिन्सेंट या
व्यक्तीच्या लक्षात आली. कत्तुर गाव करूवन्नुर नदीच्या काठावर वसलेलं आहे. गावातले
लोक अंघोळीला, कपडे धुवायला याच नदीवर जातात. नदीवर अंघोळ
करताना बुळबुळीत झालेली साबणाची वडी हातातून सटकून तळाशी जाते आणि मग नवीन साबणाची
वडी विकत आणेपर्यंत सगळ्या कुटुंबाला साबण न वापरताच अंघोळ करावी लागते. गावातल्या
लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ताबडतोब साबणाची
वडी विकत घेणं ही त्यांच्या दृष्टीने न परवडणारी गोष्ट आहे. धडपड्या स्वभावाच्या
व्हिन्सेंट यांनी आपल्या गावकऱ्यांची ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयोग
करायला सुरुवात केली……..
No comments:
Post a Comment