वर्तमानपत्रे : वाचनसंस्कृती रुजविणारे प्रभावी साधन
प्रत्येक वर्तमानपत्राचं शीर्षक वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जातं. या शीर्षकामध्ये अक्षरं लिहिण्याची शैली, अक्षरांचा आकार, रंगसंगती वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे वर्तमानपत्राच्या शीर्षकाखाली दिनांक, वार, आवृत्ती प्रकाशित झाल्याचे ठिकाण, किंमत, पृष्ठसंख्या इत्यादी माहिती दिलेली असते. प्राथमिक स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात उपलब्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांच्या शीर्षकांची कात्रणे चिकटवहीत चिकटवून शीर्षकाखाली छापलेल्या माहितीचे निरीक्षण व नोंद करण्यास सांगता येईल.
वर्तमानपत्रासाठी बातमी कशी मिळवली जाते, त्या बातमीचं प्रभावी सादरीकरण करण्यासाठी छायाचित्रे कशी घेतली जातात, या बातमीवर वार्ताहरापासून ते संपादकांपर्यंत कोण-कोण आणि कसे लेखन संस्कार करतात, बातमी छापण्यामध्ये पेज डिझायनरची भूमिका काय असते, वर्तमानपत्राची छपाई कशी केली जाते, गावोगावी ही सगळी वर्तमानपत्रं योग्य वेळेत कशी वितरित केली जातात, अशा संदर्भातला सर्वेक्षणात्मक प्रकल्प महाविद्यालयीन विद्यार्थी करू शकतात. या प्रकल्पातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष वापर हे विद्यार्थी महाविद्यालयातून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या भित्तीपत्रकांसाठी किंवा वार्षिक मासिकासाठी करू शकतात.......
CLICK HERE to Read More